
Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या चिठ्ठी ची दहशत Salman Khan मराठी कार्यक्रमात आला
बाळासाहेब ठाकरे आणि सिनेकलावंत हे एक अनोख समीकरण होतं सुपरस्टार दिलीप कुमार राज कपूर यांच्याशी त्यांची खास मैत्री होती लता मंगेशकर बाळासाहेबांना आपला मोठा भाऊ म्हणायच्या
अमिताभ बच्चनला त्याच्या अपघातावेळी बाळासाहेबांनी केलेली मदत आजही विसरु शकलेले नाहीत
संजय दत जेव्हा बॉम्बस्फोट प्रकरणात अडकला त्यावेळी सुनील दत्त यांनी त्याला बाळासाहेबांच्या पायाची घातला होता
मराठी सुपरस्टार दादा कोंडके तर बाळासाहेबांचे भक्त होते त्यांनी शिवसेनेच्या अनेक सभा गाजवल्या होत्या
बाळासाहेबांनी फक्त मोठे कलाकारच नाहीतर या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या जुनिअर आर्टिस्ट असो तंत्रज्ञ यांचे सुद्धा प्रश्न सोडवण्याचा पुढाकार घेतला होता त्यामुळे बाळासाहेबांची विनंती म्हणजे त्या काळात आदेशात मानला जायचा
शिरीष कणेकर यांचा माझी फिल्लमबाजी नावाचा एक पात्री प्रयोग त्या काळात खूप प्रसिद्ध होता तर झालं असं की या नाटकाचा प्रयोग होता असं म्हटल्यावर त्याला तसाच मोठा सेलिब्रिटी प्रमुख पाहुणा लागणार होता
शिरीष कणेकर यांनी खूप जणांना संपर्क करून पाहिलं पण काही ना काही कारणास्तव कोणता सेलिब्रिटी तयार होत नव्हता आता जशी तारीख जवळ येत होती तसं कणेकरांच टेन्शन वाढू लागलं
शेवटचा पर्याय म्हणून बाळासाहेबांकडे गेले
बाळासाहेब कणेकरांच्या नर्मविनोदी शैलीत या लेखनाचे चाहते होते शिवाय माझी फिल्लमबाजी त्यांना खूप आवडलं होतं त्याने कणेकरांना पाहताच बाळासाहेबांनी विचारलं काय काम काढलं
काणेकर म्हणाले माझी फिल्लमबाजी च्या महोत्सवी प्रयोगासाठी फिल्मस्टार सेलिब्रिटी प्रमुख पाहुण्या म्हणून हवाय
पण कोणी तयार होत नाहीये त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली की सलमान खान मिळवून द्या
कार्यक्रमाला डायरेक्ट सलमान खान बाळासाहेब काही बोले नाहीत तिथल्या तिथे पत्र लिहायला घेतलं शिवसेनेच्या लेटरहेडवर मराठीत लिहिलं होतं प्रिय सलमान खान यांस
हे पत्र घेऊन कणेकरांचा मित्र सलमानच्या पर्सनल सेक्रेटरी ला भेटला ती चिठ्ठी बघून तो सेक्रेटरी उडालाच त्यानं विचारलं बाळासाहेब खुद्द आणेवाले है क्या?
कणेकरांनी बाळासाहेबांना काही बोलावलं नव्हतं तरी त्यांच्या मित्रांना थाप ठोकली अर्थातच ते येणार आहे
कणेकरांना विश्वास नव्हता की सलमान खान येईल कारण निमंत्रण अनौपचारिकरीत्या दिला होता म्हणून त्यांनी शेवटच्या क्षणी आपला मित्र राजेश खन्नाला तयार केले
कार्यक्रमाच्या दिवशी राजेश खन्ना वेळेत आला सलमान येणार नाही गृहीत धरून कार्यक्रम सुरू झाला राजेश खन्ना आणि शिरीष कणेकर यांची स्टेजवर जुगलबंदी सुरू होती
आणि अचानक स्टेज मागे विंगेत गलबला सुरू झाला सलमान आला सलमान आला कणेकर म्हणतात सलमान जत्रेत हरवलेल्या मुलासारखा भांबावलेले दिसत होता त्याला कळतच नव्हतं कि आपण कुठे आलोय कसला कार्यक्रम चालाय
स्टेजवर राजेश खन्नाला बघून त्याच्या जीवात जीव आला आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाचे अभिवादन स्वीकारत मंचावर आल्या आल्या फिल्मी स्टाईलमध्ये आपले सीनियर असलेल्या राजेश खन्नांचे पाय धरले
त्यानंतर तो थेट प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याने मैने प्यार किया मधले डायलॉग म्हणून दाखवला आणि तसाच टाळ्यांच्या गजरात तो निघूनही गेला
शिरीष कणेकर यांच्या मते आजही सलमानला विचारलं तरी त्याला सांगता येणार नाही तिथे त्या दिवशी कोणत्या कार्यक्रमाला गेला होता तो आलाही फक्त बाळासाहेबांच्या शब्दाखातर