Top 16 संपूर्ण आरती संग्रह – Sampurna Aarti Sangrah Download Pdf

सकाळी मनाला भावणारी सुपरहिट: Top 16 संपूर्ण आरती संग्रह – Sampurna Aarti Sangrah: आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण आरती संग्रह lyrics आणि सोंग पण जे तुम्ही ऐकूही शकता आणि वाचूहि शकता, जे तुम्हाला सकाळच्या असो किंवा सणाच्या पूजेला लागणाऱ्या आरती आहेत, हे सगळे आरती क्रमाने लावले आहेत या क्रमाने तुम्ही आरती घेऊ शकता आणि

जर तुम्हाला हे aarti lyrics Pdf download करायचे असल्यास संपूर्ण आरती संग्रह lyrics pdf च्या रूपात टाकले आहेत तुम्ही ते donwload करू शकता त्याची लिंक article च्या शेवटला दिली आहे त्यामुळे तुम्हाला पुस्तक खरेदी करायची गरज नाही आणि online आरती शोधण्याची पण गरज नाही आणि whatsaap आणि social media वर share करू शकता, हे ब्लॉग Sampurna Aarti Sangrah Lyrics In Marathi आणि Aarti Sangrah Lyrics Marathi Pdf Download हे पूर्ण वाचा आणि कस वाटल comments मध्ये कळवायला विसरू नका.

Contents hide
1 Top 16 संपूर्ण आरती संग्रह – Sampurna Aarti Sangrah – Sangrah Lyrics Marathi Pdf Download

Top 16 संपूर्ण आरती संग्रह – Sampurna Aarti Sangrah – Sangrah Lyrics Marathi Pdf Download

top-16-संपूर्ण-आरती-संग्रह-sampurna-aarti-sangrah
Sampurna Aarti Sangrah – Sangrah Lyrics Marathi Pdf Download

मित्रांनो, आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी संपूर्ण आरती संग्रह पुस्तक मराठी PDF / आरती संग्रह मराठी PDF अपलोड केली आहे. आरतीला ‘रात्रिका’ किंवा ‘आरती’ आणि ‘निर्जन’ असेही म्हणतात. पूजेच्या शेवटी आरती केली जाते. आरती ही पूजा मंत्र आणि कृतीशिवाय असली तरीही त्यात पूर्णता येते. येथून तुम्ही Sampurna Aarti Sangrah Lyrics Marathi Pdf Download / संपूर्ण आरती संग्रह lyrics pdf विनामूल्य डाउनलोड करू शकता.

Sukh Karta Dukh Harta Lyrics in marathi- सुखकर्ता दुःखहर्ता – Ganpati Aartiसंपूर्ण आरती संग्रह

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळाची

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती
जय देव जय देव

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया
जय देव जय देव

लंबोदर पितांबर फनी वरवंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना
जय देव जय देव

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती
जय देव जय देव

Lavthavti Vikrala Aarti Lyrics in marathi – लवथवती विक्राळा शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।२।।

देवीं दैत्यीसागरमंथन पैं केले।
त्यामाजी अवचित हळाहळ उठिले।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले।। जय. ।।३।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचे बीज वाचें उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।४।।

Durge durgat bhari Aarti Lyrics in marathi – दुर्गे दुर्घट भारी – श्री देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

Yuge Atthavis aarti lyrics in marathi – Vitthal Aartiसंपूर्ण आरती संग्रह

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥

तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ॥
राई-रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळीती राजा विठोबा सावळा ॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळीती ॥

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल:

Trigunatmak Trimurti aarti lyrics in marathi – दत्ताची आरती – Marathi Aarti Song

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

Shendur Lal Chadhayo Aarti Lyrics in marathi – Ganesh Aarti

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥
जय देव जय देव..

जय देव जय देव,
जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन
मेरा मन रमता,
जय देव जय देव ॥

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि ।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥
जय देव जय देव..

जय देव जय देव,
जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन
मेरा मन रमता,
जय देव जय देव ॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥

जय देव जय देव,
जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन
मेरा मन रमता,
जय देव जय देव ॥

Sai Baba Aarti Lyrics in marathi – Sai Baba Songs – आरती साई बाबा

ॐ जय साईं हरे, बाबा शिरडी साईं हरे।
भक्तजनों के कारण, उनके कष्ट निवारण॥
शिरडी में अवतरे, ॐ जय साईं हरे॥ ॐ जय…॥

दुखियन के सब कष्टन काजे, शिरडी में प्रभु आप विराजे।
फूलों की गल माला राजे, कफनी, शैला सुन्दर साजे॥
कारज सब के करें, ॐ जय साईं हरे ॥ ॐ जय…॥

काकड़ आरत भक्तन गावें, गुरु शयन को चावड़ी जावें।
सब रोगों को उदी भगावे, गुरु फकीरा हमको भावे॥
भक्तन भक्ति करें, ॐ जय साईं हरे ॥ ॐ जय…॥

हिन्दु मुस्लिम सिक्ख इसाईं, बौद्ध जैन सब भाई भाई।
रक्षा करते बाबा साईं, शरण गहे जब द्वारिकामाई॥
अविरल धूनि जरे, ॐ जय साईं हरे ॥ ॐ जय…॥

भक्तों में प्रिय शामा भावे, हेमडजी से चरित लिखावे।
गुरुवार की संध्या आवे, शिव, साईं के दोहे गावे॥
अंखियन प्रेम झरे, ॐ जय साईं हरे ॥ ॐ जय…॥

ॐ जय साईं हरे, बाबा शिरडी साईं हरे।
शिरडी साईं हरे, बाबा ॐ जय साईं हरे॥

श्री सद्गुरु साईंनाथ महाराज की जय॥

Hanuman Aarti Lyrics in marathi – Satrane Uddane Aarti

श्रीमारुतीची आरती सत्राणें उड्डाणें

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥ ध्रु० ॥

दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥
रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव० ॥ २ ॥

Aarti Saprem Lyrics in marathi – आरती सप्रेम – Vitthala Marathi Song

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटि नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनिया देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागता शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥

रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठी देवा कासव झालासी ॥
दाढे धरुनी पृथ्वी नेता वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥

पाचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारी तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिले सीतेला ॥
पितृवचनालागी रामे वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥

देवकीवसुदेवबंदीमोचन त्वा केले ।
नंदाघरी जाउनी निजसुख गोकुळा दिधले ।
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७ ॥

Sant Tukaram Aarti Lyrics in marathi – आरती तुकारामाAarti Sangrah Lyrics

आरती तुकारामा ।
स्वामी सद्गुरू धामा ।
सच्चीदानंद मूर्ती ।
पाय दाखवीं आम्हां ।
दाखवीं आम्हां ।

आरती तुकारामा ।

राघवें सागरांत, पाषाण तारीले ।
तैसे हे तुकोबाचे ।
अभंग उदकीं रक्षीले ।
उदकीं रक्षीले ।

आरती तुकारामा ।
स्वामी सद्गुरू धामा ।
सच्चीदानंद मूर्ती ।
पाय दाखवीं आम्हां ।
दाखवीं आम्हां ।
आरती तुकारामा ।

तुकितां तुळणेसी ।
ब्रह्म तुकासि आलें ।
म्हणुनी रामेश्वरें ।
चरणीं मस्तक ठेविलें ।
मस्तक ठेविलें ।

आरती तुकारामा ।
स्वामी सद्गुरू धामा ।
सच्चीदानंद मूर्ती ।
पाय दाखवीं आम्हां ।
दाखवीं आम्हां ।
आरती तुकारामा ।

Aarti Dnyanraja Lyrics in marathi – Sant Dnyaneshwar Aarti

आरती ज्ञानराजा ॥
महाकैवल्यतेजा ॥
सेविती साधुसंत ॥
मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥

लोपलें ज्ञान जगीं ॥
त नेणती कोणी ॥
अवतार पांडुरंग ॥
नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ॥ १ ॥

कनकांचे ताट करीं ॥
उभ्या गोपिका नारी ॥
नारद तुंबरु हो ॥
साम गायन करी ॥ आरती० ॥ २ ॥

प्रगट गुह्य बोले ॥
विश्व ब्रह्मची केलें ॥
रामा जनार्दनीं ॥
पायीं ठकचि ठेलें ॥ आरती० ॥ ३ ॥

Jaidev Jaidev Datta Avadhuta lyrics in marathi – जयदेव जयदेव दत्ता अवधूता

जय देव जय देव जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥ ध्रु० ॥

तूझे दर्शन होता जाती ही पापे ।
स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरिते ॥
चरणी मस्तक ठेवुनि मनि समजा पुरते ।
वैकुंठीचे सुख नाही यापरते ॥ जय० ॥ १ ॥

सुगंधकेशर भाळी वर टोपीटीळा ।
कर्णी कुंडले शोभति वक्षःस्थळि माळा ॥
शरणागत तुज होता भय पडले काळा ।
तूझे दास करिती सेवासोहळा ॥ जय० ॥ २ ॥

मानवरूपी काया दिससी आम्हास ।
अक्कलकोटी केला यतिवेषे वास ॥
पूर्णब्रह्म तोची अवतरला खास ।
अज्ञानी जीवासी विपरीत हा भास ॥ जय० ॥ ३ ॥

निर्गुण निर्विकार विश्वव्यापक ।
स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥
अनंत रूपे धरिसी करणे मायीक ।
तूझे गुण वर्णिता थकले विधिलेख ॥ जय० ॥ ४ ॥

घडता अनंतजन्मसुकृत हे गाठी ।
त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी ॥
सुवर्णताटी भरली अमृतरसवाटी ।
शरणागत दासावरि करी कृपादृष्टी ॥ जय० ॥ ५ ॥

Sai Digambara Aarti Lyrics in marathi – Sai Baba Aarti – साई दिगंबरा अक्षय रुप अवतारा

ऐसा येई बा । साई दिगंबरा ।
अक्षयरूप अवतारा । सर्वही व्यापक तू ।
श्रुतिसारा । अनुसया त्रिकुमारा ।
बाबा येई बा ॥ध्रु॥

काशी स्नान जप, प्रतिदिवशी ।
कोल्हापुर भिक्षेसि । निर्मल नदी तुंगा,
जल प्राशी । निद्रा माहुर देशी ॥
ऐसा येईबा ॥१॥

झोळी लोंबतसे वाम करी । त्रिशुल डमरू धारी ।
भक्ता वरद सदा सुखकारी ।
देशील मुक्ति चारि ॥
ऐसा येईबा ॥२॥

पायी पादुका । जपमाला कमंडलू मृगछाला ।
धारण करिशि बा ।
नागजटा मुगट शोभतो माथा ॥
ऐसा येईबा ॥३॥

तत्पर तुझ्या या जे ध्यानी । अक्षय त्यांचे सदानि ।
लक्ष्मी वास करी दिनरजनी ।
रक्षिसि संकट वारुनि ॥
ऐसा येईबा ॥४॥

या परीध्यान तुझे गुरुराया । दृश्य करी नयना या ।
पूर्णा नंद सूखे ही काया ।
लाविसि हरीगुण गाया ॥
ऐसा येईबा ॥५॥

Yei Oh Vitthale Aarti Lyrics in marathi – Vitthal Aarti – Marathi Devotional Songs

येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
निढळावरी कर…
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें
ठेवुनी वाट मी पाहें।

येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
पंढरपुरी आहे…
पंढरपुरी आहे माझा मायबाप
हो माझा मायबाप
येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये। १।

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
गरुडावरी बैसोनि…
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला
हो माझा कैवारी आला
येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये। २।

Ghalin Lotangan Aarti Lyrics in marathi – Ganesh Aarti with Lyrics

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा…
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी
हो जीवे भावें ओवाळी
येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये। ३।

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां
कृपादृष्टी पाहें…
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया
हो माझ्या पंढरीराया
येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये। ४।

mantra pushpanjali lyrics in marathi – Ganesh Chaturthi Songs

ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवा:स्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
तेह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ।। १।।

ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने। नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः।।२।।

ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टयं राज्यं
महाराज्यमाधिपत्यंमयम समन्त पर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषं
आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ।।३।।

तदप्येषः श्लोको sभिगीतो मरूतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे ।
अविक्षतस्य कामप्रेर्विश्वेदेवा सभासद इति।।४।

ओम एकदंताय विधमहे वक्रतुण्डाय धिमाहि तन्नो दंति प्रचोदयात ।

mantra pushpanjali Meaning – गणेश चतुर्थी अर्थ – Sampurna Aarti Sangrah

  • चरण एक अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.
  • चरण दोन अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला माझ्या सर्व कामनांची पूर्ति प्रदान करो.
  • चरण तीन अर्थ – आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.
  • चरण तीन द्वितिय अर्थ – आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.
  • चरण चार अर्थ – या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.
Aarti Sangrah Marathi Pdf Download – Sampurna Aarti Sangrah Download

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल:

Sharing Is Caring:

Leave a Comment

बॉलीवुड इंडस्ट्री के ये हैं पजेसिव लवर्स उर्फी जावेद का डिस्को बॉल स्टाइल देखते ही चकराया फैंस का दिमाग ‘मैंने पायल है’ के रीमेक को लेकर Neha Kakkar पर बरसीं Falguni Pathak Jayson Tatum Major achievements Jayson Tatum Net Worth, Expensive lifestyle