Shree Ramacha Palna Lyrics – Ram Navami Palna Marathi Song

Shree Ramacha Palna Lyrics – Ram Navami Palna Marathi Song

Shree Ramacha Palna Lyrics - Ram Navami Palna Marathi Song

Song Name Shree ramacha palna – Ram navami palna
Singer(s)

Ramacha Palna bala jo jo re – Shree Ramacha Palna Lyrics – Ram Navami Palna Marathi Song रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. आता आपण ऐकणार आहोत श्रीरामाचा पाळणा. 

Shree Ramacha Palna Lyrics – Ram Navami Palna Marathi Song

पहिल्या दिवशी बोलली लिला

दशरथ राजाला पुत्र हो झाला

कौसल्या मातेने झोका हा दिला

जो बाळा जो जो रे जो ॥१॥

दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे

जशी खुलली कळी कमळाची

प्रसूत झाली त्या वेळेशी

जो बाळा जो जो रे जो ॥२॥

तिसऱ्या दिवशी वदली गंगा

नका बायांनो हो करु दंगा

दशरथ राजाला जाऊनी सांगा

जो बाळा जो जो रे जो ॥३॥

चवथ्या दिवशी वदली उमा

बाळाच्या रुपाची लागेना सीमा

ऐसी बोलली महादेव भीमा

जो बाळा जो जो रे जो ॥४॥

पाचव्या दिवशी पाची कल्लोळ

बाळ जन्मले रुप सावळ

राम निघाला रावणाचा काळ

जो बाळा जो जो रे जो ॥५॥

सहाव्या दिवशी बोलली तारा

आला सोनार आपुल्या घरा

बाण धनुष्य रामाला करा

जो बाळा जो जो रे जो ॥६॥

सातव्या दिवशी धनुष्य टाकिले

लक्ष्मण अवतार शोधिले

यातून एक युग लोटले

जो बाळा जो जो रे जो ।।७।।

आठव्या दिवशी सखी वदली

सीता रामाची रावणाने नेली

मारुतीरायाने लंका जाळली

जो बाळा जो जो रे जो ॥८॥

नवव्या दिवशी बोलली भागा

बायांनो तुम्ही चरणांशी लागा

दान चुड्याचे रामाला मागा

जो बाळा जो जो रे जो ॥९॥

दहाव्या दिवशी बोलला गजा

संगे घेऊन वानर फौजा

बिभीषणा केला लंकेचा राजा

जो बाळा जो जो रे जो ॥१०॥

अकराव्या दिवशी अकरावा रंग

ब्रम्हा विष्णूला लागला छंद

पाचही हत्यारे रामाच्या संग

जो बाळा जो जो रे जो ॥११॥

बाराव्या दिवशी जना बोलली

लक्ष्मणाला शक्ती लागली

पहाड आणाया गेला मारुती

जो बाळा जो जो रे जो ॥१२॥

तेराव्या दिवशी नंदीवर बसले

देशोदेशी वानर धाडिले

रामाने मारुतीला स्वराज्य दिले

जो बाळा जो जो रे जो।।१३।।

चौदाव्या दिवशी कहाणी सारी

बिजली बत्तीचा प्रकाश भारी

तेहतीस कोटी देव जमले दरबारी

जो बाळा जो जो रे जो ॥१४॥

पंधराव्या दिवशी अवतार बदले

कृष्ण पांडव पुढे निघाले

कंस मामाला त्यांनी वधिले

जो बाळा जो जो रे जो ||१५||

सोळाव्या दिवशी सोळावा केला

गुरु वसिष्ठ विद्या बोलला

धन्य रामाचा पाळणा गाईला

जो बाळा जो जो रे जो ॥१६॥

YouTube Video

 

Read More Marathi Song LyricsSharing Is Caring:

Leave a Comment

3 शादियां करने वाले संजय दत्त का इन 5 एक्ट्रेसेस संग जुड़ा था नाम जब उड़ी थी ऐश्वर्या राय और अनिल अंबानी के अफेयर की खबर ऐश्वर्या राय से अमिताभ तक, टीना अंबानी के बेहद क्लोज है बच्चन फैमिली राजेश खन्ना से शादी करना चाहती थीं अनिल अंबानी की वाइफ टीना अंबानी अनिल अंबानी की पत्नी टीना अंबानी के ऐसे थे अपने ससुर धीरूभाई से संबंध