अजय देवगनच्या (Ajay Devgan) 'रुद्रा' (Rudra : The Edge Of Darkness) या वेब सीरिजचा ट्रेलर आज प्रदर्शित झालेला आहे.

या सीरीज द्वारे अजय देवगण OTT दुनियेत पदार्पण करीत असताना दिसत आहे.

तसेच या वेबसीरिजमध्ये अजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सीरिजमध्ये अजय एका पोलिस (cop) अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगणची ही वेब सीरीज ब्रिटिश सायकॉलॉजिकल ड्रामा ह्यावर आधारित आहे

अजय देवगणने या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने caption लिहिले आहे,"अंधार आणि प्रकाश यांच्यातील रेषा...मी तिथेच राहतो. रुद्रा लवकरच येत आहे"

ही रुद्रा वेबसीरिज  डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंटने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.