Shivaji Maharaj Jayanti: पठ्ठ्यानं घरावर बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा

शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी हा उद्देश

यवतमाळ - छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने आर्णी येथील एका तरुणाने चक्क आपल्या घरावरच 5 फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.

आदर्शवत संकल्पना प्रत्यक्षात आणणार्‍या सचिन भोयर याने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून अनेकांनी त्यांच्या या संकल्पनेचं कौतूक केलं आहे. 

आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही. घर बांधतेवेळी पाच फुट उंचीचा पुतळाही बसविला.

19 फेब्रुवारीला रयतेच्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे.

शिवमहोत्सवदेखील साजरा होत आहे. परंतु, सचिन भोयर हा केवळ एकच दिवस नाही तर वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन करतो. त्यानंतरच आपल्या कार्याला सुरुवात करतो. 

पुतळ्यावरून राज्यात राजकारण होताना दिसते. त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घरीच छत्रपती आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा उभारावा. तरुणाईने छत्रपतींचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा असे, आवाहन सचिन भोयर याने केले आहे.

लहानपणापासून सचिन शिवाजी महाराजांचा भक्त आहे. त्याने आपल्या घरावरच छत्रपतींचा पाच फुटाचा पुतळा बसविला. नित्यनियमाने न चुकता तो पुजन करतो. पुतळ्याची विटंबना होऊ नये, यासाठी त्याने घरीच पुतळा बसविला आहे.

Shiv Jayanti: शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का