अफेअरच्या बाबतीत गायिकेचे नाव फक्त एकाच व्यक्तीशी जोडले गेले. होय, लता मंगेशकर देखील त्यांच्या काळात प्रेमात पडल्या होत्या.
'गाण कोकिळा', 'स्वरांची राणी' आणि 'सुरांची मलिका' अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सदाबहार गायिका लता मंगेशकर यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने करोडो लोकांना वेड लावले.
आज सकाळी 8.12 वाजता लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि त्या कायमच्या आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
लोकांच्या प्रेमासोबतच लता मंगेशकर यांनी खूप संपत्तीही कमावली आहे
Click Here
लता मंगेशकर यांना त्यांचे चाहते प्रेमाने लता दीदी म्हणत. लताजींच्या कोट्यवधी चाहत्यांच्या मनात एक प्रश्न असेल की, लताजींनी लग्न का केले नाही? तर आज आम्ही तुम्हाला लता जी यांच्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत.
असे म्हणतात की, लताजीही कोणाच्या तरी प्रेमात पडल्या होत्या. पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यांची प्रेमकहाणी अपूर्णचं राहिली.
ती व्यक्ती दिवंगत क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष राज सिंह होते.
लतादिदि त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या शैलीवर प्राण ओवाळून टाकत असतं. दिदी राज सिंह यांना 'मिठ्ठू' नावाने हाक मारायचे.
The Fame Game Full Movie Leaked Online For Free Download Then Click Here
असे म्हटले जाते की, लता मंगेशकर आणि राज सिंह एकमेकांचे होणार होते, पण जेव्हा राज सिंह लग्नाबाबत बोलले तेव्हा त्यांचे वडील महारावल लक्ष्मण सिंह यांनी लग्न करण्याचा त्यांचा विचार नाकारला.
त्यामागचे कारण असे की, लतादीदी राजघराण्यातील नव्हत्या. अशा स्थितीत हे नाते तुटलं. मात्र, या दोघांचं प्रेम इतकं अतुट होत की, त्यानंतर लताजींनी कधीही लग्न केले नाही आणि राज यांनीही कोणाशी लग्नगाठ बांधली नाही.
दोघांनी लग्न केलं नसलं तरी ते नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत.
याशिवाय एक गोष्ट अशीही सांगितली जाते की, लता मंगेशकर म्हणतात की, घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी लग्न केले नाही.
लहान वयातच घरच्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी लग्नाचा विचारही केला नाही.
आपल्या वडिलांच्या निधनानंतर, लता मंगेशकर, त्यांच्या भावंडांपैकी सर्वात मोठ्या होत्या. त्यांनी वडिलांच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाची काळजी घेतली.